fbpx
 

Cart

Your Cart is Empty

Back To Shop

Cart

Your Cart is Empty

Back To Shop
Sale

द टीसीएस स्टोरी अँड बियॉंड

370.00

‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या ‘ग्लोबल’ प्रवासाची यशोगाथा

भविष्यात खूप काही चांगले, भव्यदिव्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक!

(In Stock)

द टीसीएस स्टोरी… अॅन्ड बियाँड 

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सन २००३ मध्ये स्वतसाठीच एक निश्चित उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला. टॉप टेन बाय २०१० असे ध्येय त्यांनी ठेवले. विशेष म्हणजे कंपनीने एक वर्ष आधीच २००९ मध्ये टॉप केले. सन १९९६ मध्ये एस. रामदोराई कंपनीचे सीईओ बनले. त्यांच्या कारकिर्दीत कंपनीने ६ अब्ज डॉलर्स पर्यंत व्यवसाय नेला. आयटी सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रामध्ये जगभरातील सर्वात मोठी कंपनी बनण्याचा मान मिळवला. जगाच्या पाठीवरील चाळीस देशांमध्ये टीसीएसचे १,६०,००० कर्मचारी आहेत. आजमितीला कंपनीला दरवर्षी ६ अब्ज डॉलरचा महसूल मिळतो.

आधुनिक भारताच्या यशोगाथेमध्ये टीसीएसची कथा फार उठावदार मानावी लागेल. यशस्वी उद्योजक म्हणून एस. रामदोराईंकडे आदराने पाहिले जाते. सॉफ्टवेअर सेवाक्षेत्रात पायाभूत कार्य करण्याऱ्या या कंपनीने अवघ्या जगात आपल्या कामाचा ठसा कसा उमटवला, वाय-टू-के समस्येचे आव्हान कसे उचलून धरले हे वाचनीय आहे. टीसीएसचा आयपीओ सुद्धा असा विक्रमी ठरला. भारतात आज आयटी क्षेत्र भरभराटीस येत आहे. परंतु या इमारतीचा मजबूत पाया टीसीएसने घातला आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.

उत्कृष्टता या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे टीसीएस अशी ख्याती आज संपूर्ण विश्वात या कंपनीने मिळवली. निश्चिततेचा अनुभव असे बोधवाक्य बनवून त्याच मार्गाने टीसीएसने यशोशिखर गाठले. कामाचा उत्कृष्ट दर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि व्यवहारातील पारदर्शकता हे गुण एस. रामदोराई यांनी टीसीएसचा विस्तार करताना टीमच्या अंगी भिनवले. त्यामुळेच ही कंपनी आणि रामदोराई नवीन आदर्श निर्माण करू शकले.

भविष्यात खूप काही चांगले, भव्यदिव्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक!

______________________________

लेखक : एस. रामदेसाई
प्रकाशक : अमेय इन्स्पायरिंग बुक्स
पृष्ठे : ३७७

______________________________

The TCS Story and Beyond

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द टीसीएस स्टोरी अँड बियॉंड”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

Cart

Your Cart is Empty

Back To Shop